Startups
Edit

mynatak

http://www.mynatak.in/
Last activity: -
Probably Closed - Reference to
Categories: EntertainmentGamingWebsite
खंत करत बसणे, हळ-हळणे, रडत बसणे, या ऎवजी आम्ही लढण्याचा आणि पुढाकार घेण्याचा पर्याय निवडला !
आता जो येईल, त्याच्या साक्षीने-सोबतीने.. आणि जो नाही त्याच्या शिवाय… पण मराठी रंगभूमीला मुख्य प्रवाहात आम्ही आणणारच…!!!!


मराठी मध्ये दर्जेदार साहित्य निर्मिती होत नाही, दर्जेदार नाट्य-निर्मिती होत नाही, अशी कुण-कुण आज-काल वरचेवर ऐकू येते.
तसेच आजची युवा पिढी ही आपल्या कला-प्रकारांबद्दल उदासीन आहे, अशी ही ओरड वरचे-वर ऐकायला मिळतेच.
काही अंशी ते खरे असेलही… पण जर मुळाशी जाऊन शोध घेतला तर काही वेगळीच कारणे समोर येतात.
.
मुळात नाट्य-प्रेमी जनता आजही प्रचंड प्रमाणात अस्तित्वात आहे. दर्जेदार नाट्य आणि साहित्य निर्मिती सुद्धा होतेय. रंगभूमी आजही दर्जेदार कलावंत निर्माण करतेय. पण मग अडतंय कुठे??

तर मित्रांनो, या सर्व गोष्टी अडतायेत, त्या "जागृती" अभावी….

नव-नवीन चित्रपट, गाणी, जाहिराती, On line Games, इत्यादी गोष्टी जेवढ्या सहजपणे आपल्या पर्यंत पोचतात, जितक्या सहजपणे उपलब्ध असतात, तितक्या सहजपणे आपली नाटके किवा साहित्य-निर्मिती पोचत नाही. आणि कारण म्हणजे "पैसा".

म्हणजे कसं दुष्ट-चक्र आहे बघा, कि पैसा नाही म्हणून हि कला समाजा पर्यंत पोचत नाही… आणि ती पोचत नाही, म्हणून आर्थिक उलाढाल होत नाही.

आता ठरवलं तर आपण हि अरेरे…. म्हणत गप्प बसू शकतो. पण त्यानी हे दुष्ट-चक्र कधी तरी सुटेल का??

आम्ही ठरवलंय कि नाही!!!!! आमच्या डोळ्यांदेखत, हे निदान आम्ही तरी होऊ देणार नाही.
जी काही समाज-जागृती करता येईल ती आम्ही या पेज च्या माध्यमातून करू, तुमच्या सारख्या सम-विचारी मित्रांच्या सोबतीने, सहकाराने-साक्षीने करू, आणि आपल्या माय-मराठी तील या प्राचिन कलाविष्काराला त्याच्या पूर्वपदावर आणि मनोरंजनाच्या मुख्य प्रवाहात आणूनच थांबू. आणि त्यासाठीच हा प्रांजळ प्रयत्न.

गरज आहे ती फक्त तुमच्या सोबतीची……… काय मग? कराल न सोबत ???? :)
Likes
1.01K
Followers
8.8K

Overview

Location
India, Maharashtra, Mumbai

Reviews 0

Sign up to leave a review

Sign up Log In